मेंदी - भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग भारतीय संस्कृतीत, विशेषतः लग्न समारंभात,साखरपुडा , आता तर प्रत्येक समारंभाला मेंदीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. मेंदी केवळ एक कला प्रकार नसून, मेंदी शुभ मानली जाते आणि आनंद, प्रेम व सौभाग्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. लग्नघरात मेंदीचा कार्यक्रम हा एक अविस्मरणीय सोहळा असतो, जिथे वधूच्या हातावर आणि पायांवर नक्षीदार काढली जाते. तसेच वधू वरांकडील स्त्रियांच्या मुलींच्या अगदी लहानापासून मोठ्या वयापर्यंतच्या स्त्रियांच्या मुलींच्या हातावर मेंदी काढली जाते . ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व मेंदीचा इतिहास खूप जुना आहे. वैदिक काळापासून मेंदी चा वापर सौंदर्यप्रसाधन म्हणून केला जात होता असे मानले जाते. धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या, मेंदी ला एक पवित्र वनस्पती मानले जाते. अनेक परंपरांनुसार, मेंदी ...
मकरसंक्रांत हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी संक्रांत साजरी केली जाते. हा सण नवीन ऋतूचे, नवीन आशेचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. भारताच्या विविध भागांमध्ये संक्रांत वेगवेगळ्या पद्धतींनी साजरी केली जाते. महाराष्ट्रात संक्रांत म्हटले की तीळगूळ, हळदीकुंकू, वाण आणि पारंपरिक पोशाख अशी सुंदर परंपरा डोळ्यांसमोर येते.या सणाशी जोडलेली एक विशेष आणि लक्षवेधी गोष्ट म्हणजे " काळ्या रंगाची साडी ." परंपरेनुसार, आपल्या सणांमध्ये काळा रंग शुभ मानला जात नाही. त्यामुळे लग्न, पूजाविधी किंवा धार्मिक सणांमध्ये काळा रंग टाळला जायचा. मात्र मकरसंक्रांत हा सण याला अपवाद ठरला आहे. संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे, विशेषतः काळी साडी नेसण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे. ...